December 25, 2014

मधुचंद्र...

कोणी म्हणत seven days and seven nights च package म्हणजे मधुचंद्र
मी म्हणतो चांदणी रात्र, एक झोपाळा, हातात हात आणि खांद्यावर तिचे डोके म्हणजे मधुचंद्र

कोणी म्हणत Paris च्या संध्याकाळ ची रोषणाई म्हणजे मधुचंद्र
मी म्हणतो तिला अचानक भेट दिली कि तिच्या डोळ्यातली ती चमक म्हणजे मधुचंद्र

कोणी म्हणत काश्मीर च्या बागेत एकत्र फिरणं म्हणजे मधुचंद्र
मी म्हणतो न सांगता एखादा गजरा तिच्या डोक्यात माळण म्हणजे मधुचंद्र

कोणी म्हणत fancy आणि stylish कपडे घालून नवऱ्याबरोबर फिरणं म्हणजे मधुचंद्र
मी म्हणतो सणाच्या दिवशी नव्वारी साडी, टिकली अन नाकात नत म्हणजे मधुचंद्र

कोणी म्हणत तिला गुलाबाचा गुच्छ देणं म्हणजे म्हणजे मधुचंद्र
मी म्हणतो सगळ्यान देखत एक क्षण चोरून तिला "छान दिसत आहेस" म्हणणं आणि ते ऐकून तिचा चेहरा गुलाबी होणं म्हणजे मधुचंद्र

कोणी म्हणत तिच्या सुंदरतेवर कविता करणं म्हणजे मधुचंद्र
मी म्हणतो ती माहेरी असताना प्रत्येक कवितेत तिला पाहणं म्हणजे मधुचंद्र

कोणी म्हणत लाजेचा पडदा काढून एकामेकांना जाणून घेणं म्हणजे मधुचंद्र
मी म्हणतो लग्नाच्या २५ वर्षानंतर सुद्धा उखाणा घेताना लाजणं म्हणजे मधुचंद्र

कोणी म्हणत लग्नानंतर १० दिवस असतो मधुचंद्र
मी म्हणतो मनात प्रेम जागं ठेवला तर आयुष्यभर टिकतो हा मधुचंद्र

No comments:

Post a Comment

RSSChomp Blog Directory